मत्स्यपालनातून 30 कोटी उत्पन्नाचा प्रयत्न : बऱ्हाटे 

राजेंद्र सावंत
शुक्रवार, 29 जून 2018

पाथर्डी (नगर) : जिल्ह्यात 15 हजार शेततळी असून, त्यात मत्स्यपालन करून वार्षिक 30 कोटींचे उत्पादन काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा मत्स्य विभाग, आत्मा व कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचाही लाभ देण्यात येईल, अशी माहिती कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी दिली. 

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा यांच्यातर्फे कृषी अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. जिल्हा मत्स्य विभागाचे विकास अधिकारी शरद कुदळे, तालुका कृषी अधिकारी किरण मोरे, "आत्मा'चे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक बापूसाहेब होले व शेतकरी उपस्थित होते. सुजित गायकवाड यांनी स्वागत केले. गजानन घुले यांनी आभार मानले. 

मत्स्यपालनाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र डांगरे म्हणाले, "मत्स्यबिजाची नर्सरी करून त्यातून उत्पन्न मिळविता येते. चांगले मत्स्यपालन करून 20 गुंठ्यांतील शेततळ्यात 30 हजार रुपये खर्चात एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न घेता येते. तांत्रिक ज्ञान व माश्‍याचे खाद्य आणि इतर काळजी घेतली, तर शेतकऱ्यांना फळबागेसोबत चांगले उत्पन्न घेता येते.''

Web Title: try to earn 30 crores from fish farming