अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

शेवगांव (नगर) : अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकातील प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या दोन दुचाकीवर वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गुंजाळ व तुकाराम बुळे, बाळासाहेब केदार, दत्तात्रय पालवे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे.

ही घटना आज (ता.20) पहाटे 6 च्या दरम्यान मिरी मार्गे रस्त्यावर न्यू आर्टस कॉलेज जिमखान्यासमोर घडली. वाळू वाहतूक करणारे वाहन पसार झाले आहे. 
याबाबत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा कारणावरुन नागेश गोविंद निकाळजे (रा. इंदिरानगर, शेवगाव) एक अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी संघ व महसुल संघटना शेवगांव यांच्या वतीने आरोपींना अटक होईपर्यंत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन पोलीस उपअधिक्षक मंदार जावळे यांना दिले आहे.

Web Title: try to kill tehsil officer for illegal soil transport