सोलापुरात ई-बस आणण्यासाठी प्रयत्नशील - अशोक मल्लाव

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 12 जुलै 2018

सोलापूऱ : शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी भविष्यामध्ये ई-बस आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी दिली. 

मल्लाव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज  पहिल्यांदाच सभेला आले होते. विषयपत्रिकेवर काहीच विषय नसल्याने मल्लाव यांनी भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. परिवहन उपक्रमास ऊर्जितावस्था आणण्यासाठी विविध योजना राबवणार आहे. परिवहनवरच शहराची प्रगती अवलंबून असून येत्या 15 दिवसांत 50 बस मार्गावर धावतील, असे सांगितले. 

प्रवाशांमध्ये बस सेवेबाबत विश्‍वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सहा महिने ना नफा ना तोटा सेवा देणार आहे. परिवहन कर्मचाऱ्यांना शिस्त पालनासाठी कार्यशाळा घेण्याचे नियोजन आहे. परिवहन सुधारण्याचे मोठे आव्हान असलेतरी टप्प्या टप्प्यात बंद असलेल्या बस दुरुस्त करून मार्गी लावण्यात येतील. 

कुठेही बसा, कुठेही उतारा, तिकीट कमी ही योजना रिंगरूट बसद्वारे राबविणार आहे. हात दाखवा बस थांबवा यासारख्या योजनेतून प्रवासी आकर्षित होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासभेत सावरकर मैदान येथील बसस्थानकास धर्मवीर वि. रा. पाटील यांचे, लकी चौक बस स्थानकास नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तर येथील दुसऱ्या बस स्थानकास स्वातंत्र्य सेनानी मंजनराव पंढरीनाथ पुकाळे, खेडपाटी येथील बसस्थानकास स्व. रुक्‍मिणीबाई तिपण्णा बन्ने बस स्थानक असे नामकरण करण्याचे तातडीचे विषय दाखल झाले व त्यास मंजुरी देण्यात आली. 

एकाला दिली कारणे दाखवा नोटीस 
पहिल्याच सभेत एका बसचालकास शिस्तभंग प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश मल्लाव यांनी दिले. कासेगाव येथील प्रवाशांनी बसचालक एस. एम. पोरे हे वेळेवर बस आणत नाही यासह विविध तक्रारी केल्या होत्या. त्याची गांभीर्याने दाखल घेत व्यवस्थापकांनी तत्काळ कारवाईचा बडगा उचला आहे. 

Web Title: try to starts e bus in solapur said ashok mallaw