प्रिसिजनच्या विस्तारातून ब्रेन ड्रेन रोखण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

सोलापूर : चीनमध्ये उद्योग विस्तार केल्यानंतर आता सोलापूरच्या प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीने जर्मनीतील एमएफटी कंपनीसोबत भागीदारी केली आहे. कास्टिंग सोलापुरात होईल, मशिन शाफ्ट एमएफटी कंपनीत तयार होतील आणि तिथेच त्याला ग्राहक मिळेल. दोघांच्या एकत्र येण्यामुळे आणखीन प्रगती होईल, असा विश्‍वास प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यतीन शहा यांनी व्यक्त केला. सोलापुरातील प्रिसिजन कंपनीचा विस्तार होत आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत नव्याने शंभरपेक्षा अधिक जणांना रोजगार उपलब्ध होणार असून सोलापुरातील ब्रेन ड्रेन रोखण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. 

शहा यांनी बुधवारी (ता. 9) "सकाळ' कार्यालयास भेट दिली. या वेळी संवाद साधताना त्यांनी कंपनीच्या वाटचालीची माहिती दिली. सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. जर्मनीतील एमएफटी कंपनीत सध्या 200 स्थानिक कामगार आहेत. त्या कंपनीची 76 टक्के भागीदारी "प्रिसिजन'ने घेतली आहे. त्या कंपनीची आताची उलाढाल 170 कोटींची आहे. त्या कंपनीत कॅम्पशाफ्टसह वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार केले जातात. "एमएफटी'चे व्यवस्थापन उत्तम आहे, उत्पादन क्षमता चांगली आहे, पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना विस्तार करता येत नव्हता.

आता एमएफटी आणि प्रिसिजन कंपनीच्या एकत्र येण्यामुळे उत्पादन अधिक होईल आणि ग्राहकांची संख्या वाढेल, असे शहा यांनी सांगितले. 
स्थानिक तरुणांना रोजगार देण्यास आम्ही तयार आहोत. सोलापुरातील "प्रिसिजन'च्या विस्तारातही स्थानिकांनाच प्राधान्य असेल. कंपन्यांना आवश्‍यक असणारे कुशल कामगार तयार करण्यासाठी कुणीतरी पुढे यायला हवे. "प्रिसिजन'ने नाशिकमध्ये संपादन केलेल्या मेम्को कंपनीचेही काम उत्तम पद्धतीने चालू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे उपस्थित होते. 

जर्मनीतील एमएफटी कंपनीसोबत भागीदारी करणे, ही "प्रिसिजन'साठी मोठी झेप आहे. सोलापुरातील प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीचा विस्तार करण्यात येणार आहे. यामुळे डिप्लोमाचे शिक्षण झालेल्या शंभराहून अधिक स्थानिक तरुणांना रोजगार मिळणार आहे. आपण जर भारतापुरते मर्यादित राहिलो, तर अपेक्षित प्रगती होणार नाही. परदेशातील कंपन्या इकडे येत आहेत; मग आपण तिकडे का जायचे नाही? आताच्या काळात बाहेर जाऊन व्यावसाय करणे आवश्‍यक आहे. 
- यतीन शहा, 
अध्यक्ष, प्रिसिजन कॅमशाफ्ट 

Web Title: try to stop brain drain for prisijen spread