पीएमओमधून आल्याचे सांगून फसवणुकीचा प्रयत्न; अश्‍विनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांची फिर्याद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

15 मे ते 21 जून 2018 या कालावधीत सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आणि अश्‍विनी सहकारी रुग्णालयात डॉ. नायकोडे याने डॉ. घुली यांना दमदाटी केली. डॉ. नायकोडे याने डॉ. घुली यांना वेळोवेळी मोबाईलवर संपर्क केला. शासकीय विश्रामगृहात बोलावून घेतले.

सोलापूर : पंतप्रधान कार्यालयाकडून आल्याचे सांगून अश्‍विनी सहकारी रुग्णालय प्रशासनाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र घुली यांना दमदाटी करून, फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी डॉ. महेश नायकोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

15 मे ते 21 जून 2018 या कालावधीत सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात आणि अश्‍विनी सहकारी रुग्णालयात डॉ. नायकोडे याने डॉ. घुली यांना दमदाटी केली. डॉ. नायकोडे याने डॉ. घुली यांना वेळोवेळी मोबाईलवर संपर्क केला. शासकीय विश्रामगृहात बोलावून घेतले. मी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात सर्जन आहे. मला पीएमओ ऑफिसकडून व्हिजिलन्सीची जबाबदारी दिली आहे. तुमच्या हॉस्पिटलकडील मुख्यमंत्री सहाय्यता निधीची व कुंभारी येथील कॉलेज प्रकरणाची मला माहिती आहे, असे म्हणून दमदाटी केली. डॉ. नायकोडे याच्याविषयी संशय आल्याने डॉ. घुली यांनी अधिक प्रतिसाद दिला नाही.

 

Web Title: Trying to cheat by telling we are from PMO