नदीकाठच्या शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार : हर्षवर्धन पाटील

राजकुमार थोरात
रविवार, 27 मे 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी देण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून  कालव्याच्या पाण्याच्या प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी देण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून  कालव्याच्या पाण्याच्या प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील नदी काठच्या शेतकऱ्यांना नीरा नदीमधून पाणी उचलण्याची परवानगी असल्यामुळे गेल्या २५ वर्षापासुन कालव्याचे पाणी मिळत नाही. २५ वर्षापासुन पाणी मिळत नसल्याने पोटचाऱ्या मातीने बुजल्या आहेत. गेल्या तीन-चार वर्षामध्ये नीरा नदीचे पाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये आटत असून नदीचे पात्र कोरडे  पडते. नदीमध्ये पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचण होते. उन्हाळ्यामध्ये नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीचे व कालव्याचे पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली पिके जळून जावू लागली आहेत. नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी निरवांगीमध्ये आठ दिवस उपोषण, रास्तारोको, काळ्या गुढ्या उभारणे, मुंडन आंदोलने केली. मात्र, तरीही प्रशासनाने नदीमध्ये पाणी सोडले नाही.

नदीकाठच्या एका गावामध्ये सरासरी तीनशे एकरांना कालव्याचे पाणी मिळत नाही. अशी तालुक्यामध्ये सुमारे दहा ते बारा गावे असून ३६०० एकराच्या पाण्याच्या प्रश्‍न आहे. या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामाचे अावर्तन मिळावे यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेवून भेटून नदीकाठच्या शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान पाटील यांनी नदीकाठच्या पोटचाऱ्यांची पाहणी करुन सर्व गावातील पोटचाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित पाटील व या परिसरातील सुमारे दोनशे शेतकरी उपस्थित होते.

  • शेतकरी अडचणीमध्ये

गेल्या तीन चार वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये नदीचा पाणी आठत आहे. नदीकाठच्या शेतकऱ्यांना नदीमधून पाणी उचलण्याची परवानगी असते.मात्र नदीमध्ये पाणी नसल्यास पाणी कुठून उचलायचे हा प्रश्‍न महत्वाचा अाहे. प्रशासन नदीमध्ये पाणी सोडत नाही, कालव्याचे पाणी ही देत नाही यामुळे शेतकरी वर्ग अडचणीमध्ये सापडला असून नदीकाठच्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी लढा उभारणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: trying to give canal water to the river farmers said harshvardhan patil