तुळजाभवानी मंदिरात घटस्थापना करून महोत्सवाला सुरवात

जगदीश कुलकर्णी
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

तुळजापूर : आई राजा उदो-उदोच्या जयघोषात तुळजाभवानी मंदिरात आज (गुरुवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास घटस्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरवात झाली. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, त्यांच्या पत्नी भारती गमे यांच्या उपस्थितीत मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास तुळजाभवानी मातेची शेजघरातील निद्रिस्त मूर्ती सिंहासनावर अधिष्ठित करण्यात आली. त्यानंतर नित्योपचार पूजा, धुपारती, अभिषेक झाले. दहाच्या नंतर मंदिरात अंगारा मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास मंदिरातील गोमुख तीर्थकुंडापासून घटाची मिरवणूक काढण्यात आली. गोमुख तीर्थकुंडापासून मिरवणुकीने घट मंदिरात आणल्यानंतर तेथे घटस्थापना करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक, मंदिर संस्थानचे विश्वस्त उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, आमदार मधुकरराव चव्हाण, तहसीलदार दिनेश झांपले, प्रभारी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर कदम, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा यांच्यासह सेवेधारी, पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आज सकाळपासूनच शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली होती. 

Web Title: tuljapur news tuljapur mandir tuljabhavani mandir mahotsav