कोंबडी पालनाने उज्वलाताईंच्या आयुष्याला दिला टर्नंग पॉइंट 

karhad.
karhad.

कऱ्हाड - महिलांचे बचत गट म्हंटल की कुरवड्या, पापड, लोणची हे समिकरणच झाले आहे. मात्र आता महिलांनीही एवढ्यावरच न थांबता विस्तारणाऱ्या क्षेत्राला आणि जे विकतय ते तयार करायला सुरु केल आहे. त्याच जिद्दीने कापील (ता.कऱ्हाड) येथील उज्वला हणमंत पाटील यांनी माणकेश्वर महिला बचत गटाच्या माध्यमातुन गावरान कोंबड्या पालनाचा उद्योग सुरु केला. या व्यवसायात जम बसवण्यास त्यांना पहिले वर्ष संकटाचे गेले. मात्र सध्या त्या या व्यवसायातुन दरदिवशी तीन ते चार हजार रुपये कमवतात. स्वयंस्फुर्तीने चारपावले पुढे येवुन त्यांनी हा व्यवसाय सुरु करुन ग्रामीण भागातील महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे. 

लोकांच्या दैनंदिन गरजा विचारात घेवुन त्यांना जे आवश्यक आहे ते पुरवणारे व्यवसाय केले तर त्याला मरण नाही या उद्दात हेतुने उज्वला पाटील यांनी काहीतरी वेगळ करायचा या भावनेतुन कुकुट पालन व्यवसायाकडे वळण्याचे ठरवले. या व्यवसायाची त्यांनी काहीच माहिती नव्हती. व्यवसाय सुरु करण्यासाठी त्यांना पैशांची अडचण होती. ती सोडवण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यादरम्यान त्यांना कऱ्हाड पंचायत समितीमार्फत महिलांचा बचत गटांना कर्ज मिळते अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कऱ्हाड पंचायत समितीतील महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे तालुका समन्वयक निलेश पवार व विस्तार अधिकारी एस. बी. पवार यांच्याकडे त्यासंदर्भात पाठपुरावा केला. कागदोपत्री पुर्तता केल्यावर त्यांच्या बचत गटास १० लाखांचे कर्ज मंजुर झाले. त्यातील १ लाख रुपये कर्ज त्यांनी घेवुन त्यांनी कालवडे कृषी विज्ञान केंद्रातुन त्यांनी गिरीराज, वनराज, ब्लॅक अॅस्ट्रालॉर्प, कडकनाथ जातीचे प्रत्येकी १०० पिले खरेदी केली. व्यवसायास सुरुवात केल्यानंतर कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्यांनी कुकुटपालन प्रशिक्षण घेतले. घराशेजारीच शेड उभे करुन त्यांनी कुकुटपालनास प्रारंभ केला. पहिल्या टप्यात त्यांना लसीकरणासह पिल्ले जोपासण्याची एवढीही माहिती नसल्याने त्यांना अडचणी आल्या. त्यादरम्यान पिल्ले वाढली मात्र ग्राहक नसल्याने त्यांना पहिल्यांदाच सुमारे २० हजार रुपयांचा तोटा झाला. त्यानंतर मात्र जिद्द न हारता त्यांनी हा व्यवसाय जोमाने करायचाच हा ध्यास घेवुन मार्केटींगवर जोर दिला. त्यामुळे त्यांनी सांभाळलेल्या कोंबड्यांना चांगली मागणी होवु लागली. त्यातुन त्यांचा चांगलाच जम बसला आहे. त्यातुन त्यांना दररोज तीन ते चार हजार रुपयांचे उत्पन्नही मिळते. त्यातुन त्यांनी ग्रामीण भागातील महिलांसाठी घरबसल्या कुकुटपालनाचा उद्योग होवु शकतो हे सिध्द करुन त्यांच्यासाठीही ही संधीच असल्याचे दाखवुन दिले आहे. 

फोनवर घरपोच डिलेव्हरी 
उज्वलाताईंनी स्वतःच्या मुलांनाही या व्यवसायाकडे वळवले आहे. त्यांनी जोरदार मार्केटींग करुन आता चिकनची घरपोच डिलीव्हरी करण्याचीही यंत्रणा उभी केली आहे. त्यांनी फोन करा आणि घरपोच डिलेव्हरी मिळवा अशी टॅगलाईन तयार करुन त्याव्दारेही देशी कोंबड्या व त्यांच्या मटणाची विक्री सुरु केली आहे. त्यालाही आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

महिला ही परावलंबी नाही तर स्वतः कुकुटपालनासारखे व्यवसाय करुन एक कुटुंब चांगल्या पध्दतीने चालवु शकते हेच मी सिध्द केले आहे. व्यवसायात पहिल्या टप्यात अपयश आले तर खचुन न जाता जिद्दीने संकटाला सामोरे जावे. यश नक्की मिळते हे मी सिध्द केले आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी कुकुटपालन हा अर्थार्जनाचा चांगला व्यसाय आहे. 
- उज्वला पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com