विद्युतपंप जळाल्यामुळे शेटफळे प्रादेशिक पाणी योजना पडली बंद

नागेश गायकवाड
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

आटपाडी - विद्युत पंप जळाल्यामुळे शेटफळे प्रादेशिक पाणी योजना गेले आठवडा बंद आहे. यामुळे पाच गावचा पाणीपुरवठा बंद झाला असून, पाण्यासाठी लोकांची एकच धावपळ उडाली आहे.   

बनपुरी येथील कचरेवस्ती तलावावर शेटफळे पाणी योजना कार्यरत आहे. योजनेतून करगणी, शेटफळे, पात्रेवाडी, माळेवाडी आणि तळेवाडी गावांना पाणीपुरवठा केला जातो. अगोदरच तलावात पाणी कमी झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता त्यात विद्युत पंप जळाला. यापूर्वीही दुसरा विद्युत पंप जळाला असून, योजना चालविणाऱ्या समितीने दुरुस्त करून घेतलेला नाही. 

पंप दुरुस्तीसाठी कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. त्यामुळे गेली आठवड्यापासून पाचही गावचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. पंप दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीने अगोदर पाणीपट्टी द्यावी अशी समितीची मागणी आहे तर नियमित पाणीपुरवठा केला जात नसल्यामुळे यापूर्वीच जादा पैसे दिले असल्याचा आरोप ग्रामपंचायतींचा आहे. ग्रामपंचायत आणि समितीच्या संघर्षात योजना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. यामुळे पाचही गावातील वीस हजार लोकांची पाण्यासाठी धावपळ उडाली आहे. पावसाळ्यात लोकांना टँकरचे विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.    

दोन पंप शिल्लक असतानाही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाणी टंचाईचे संकट उभा राहिले आहे. याला योजना चालवणारे जबाबदार आहेत.
- गणेश खंदारे (सरपंच करगणी)

Web Title: Turns off the Sheetfal Regional Water Scheme due to the burning of the electric pump