खानापूरच्या नगरराध्यक्षपदी तुषार मंडले 

खानापूरच्या नगरराध्यक्षपदी तुषार मंडले 

खानापूर - येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी तुषार बजरंग मंडले, तर उपनगराध्यक्षपदी ज्ञानदेव बाबर यांची निवड झाली. निवडीनंतर शहरात मिरवणूक काढून जल्लोष झाला. निवडणूक अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी काम पाहिले. तुषार शिंदे यांना 11 तर आनंदराव मंडले यांना 5 मते मिळाली. उपनगराध्यक्षपदी ज्ञानदेव बाबर यांची बिनविरोध निवड झाली. 

निवडीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, एम. एम. आर. ग्रुपचे मोहन मदने आदींनी दोघांचा सत्कार केला. नगरपंचायतमध्ये सध्या जनता आघाडी आणि विकास आघाडी या दोन गटांची सत्ता आहे. निवडीनंतर तुषार मंडले यांनी सुहास शिंदेच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना विश्वासात घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करणार असेलेचे सांगितले.

निवडीप्रसंगी बबनराव माने, राजेंद्र टिंगरे, माणिक भगत, रायसिंग मंडले माजी नगराध्यक्ष भारती माने, गटनेते विजय ठोंबरे, सुनिता भगत, स्वाती टिंगरे, मंगल मंडले, अभिजित गायकवाड उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com