जिल्ह्यातील 28 हजार शेतकऱ्यांनी घेतला 'ओटीएस'चा लाभ 

Tweenty eight thousand farmers of the district took advantage of OTS
Tweenty eight thousand farmers of the district took advantage of OTS

सोलापूर : दीड लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) सुरू केली. त्यानुसार जिल्ह्यातील 27 हजार 965 शेतकऱ्यांनी लाभ घेतला असून त्यांना कर्जमाफीच्या माध्यमातून 242 कोटी 26 लाख रुपये मिळाले आहेत. 

पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातून या योजनेला अल्प प्रतिसाद असून मोहोळ, बार्शी, करमाळा, माळशिरस, अक्‍कलकोट, सांगोला व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेला आता 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दीड लाखावरील रक्‍कम संबंधित बॅंकांत भरल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नसल्याचे राज्य सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, जिल्ह्यातील सुमारे 22 हजार 'ओटीएस'साठी पात्र असलेल्या खातेदारांची यादीच शासनाकडून बॅंकांना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पैसे असूनही कर्जमाफीचा लाभ घेता येत नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची सध्या झाली आहे. कर्जमाफीचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा शेतीकामांसाठी नव्याने बॅंकांकडून कर्ज काढता येईल, अशी शेतकऱ्यांची आशा आहे. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांच्या याद्या शासनस्तरावरून बॅंकांना मिळत नाहीत. आणखी शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणीच सुरू असल्याची चर्चा आहे. 
 

तालुकानिहाय लाभार्थी तालुका शेतकरी रक्‍कम (कोटीत) 
माळशिरस 2949   14.99
मोहोळ 4607 32.72 
उत्तर सोलापूर 1364   9.64
माढा 3401 34.27 
पंढरपूर 815 9.89 
बार्शी 4061 10.15 
करमाळा 3372 33.72 
अक्‍कलकोट 3201 21.38 
सांगोला 1864 25.76
मंगळवेढा 1564 27.48
दक्षिण सोलापूर 767 8.70 
एकूण   27,965 242.26


आकडे बोलतात... 
ओटीएस चे लाभार्थी -
जिल्हा बॅंक - 5,467 
राष्ट्रीयीकृत बॅंका - 19,326 
विदर्भ कोकण बॅंक - 3,172 
एकूण - 27,965

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com