अभ्यासाला लागा ; बारावी परीक्षेचे काऊंटडाऊन सुरु 

 Twelfth exam from March 4
Twelfth exam from March 4

बेळगाव : बारावीची परीक्षा अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पदवीपूर्व शिक्षण खात्याकडून परीक्षेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 34 परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, याची दखलही शिक्षण खात्याकडून घेतली जात आहे. 

बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, याची दखल पदवीपूर्व शिक्षण खाते दरवर्षी घेते. यंदाही पदवीपूर्व शिक्षण खात्याने विशेष खबरदारी घेत विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रांचे वितरण करण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेशपत्र घेणे आवश्‍यक असून प्रवेशपत्रावर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहू नये. तसेच त्यावर कोणत्याही प्रकारची खाडाखोड करु नये, अशी सक्‍त सूचना विद्यार्थ्यांना केली जात आहे. येत्या 4 मार्चपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे उजळणीसाठी कमी वेळ आहे. त्यामुळे अधिक तास अभ्यास करण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष दिले आहे. यंदा निकालवाढीसाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले होते. त्यामुळे निकाल चांगला लागेल, असा विश्‍वास शिक्षण खात्याला वाटत आहे. बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आवश्‍यक त्या सूचना संबंधित महाविद्यालयांकडून केल्या आहेत. 

बारावी परीक्षेसाठी शहरात अधिक परीक्षा केंद्रे असून खानापूर व कित्तूर भागात परीक्षा केंद्राची संख्या कमी आहे. सर्व 34 परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही बसविण्यात आले आहेत. तसेच परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वी सर्व सीसीटिव्ही कॅमेरे सुरु आहेत की नाहीत, याची चाचणी घेण्याची सूचना सर्व परीक्षा केंद्राच्या प्रमुखांना करण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षा काळात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये-जा करण्यासाठी सवलतीच्या दरात बसपास देण्याचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ये-जा करणे सुलभ होणार आहे. 

बारावी परीक्षा जवळ आल्याने सर्व महाविद्यालयांना आवश्‍यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेशपत्र घेणे आवश्‍यक आहे. महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता पेपर लिहावेत. 
-राजशेखर पट्टणशेट्टी, प्रभारी पदवीपूर्व शिक्षणाधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com