हनुमान जयंतीची पालखी मिरवणूक काढणा-या वीस जणांना अटक

shipur hanuman mandir.jpeg
shipur hanuman mandir.jpeg

सलगरे (सांगली)- संचारबंदीतही हनुमान जन्मकाळ सोहळा साजरा करताना मिरज ग्रामीण पोलिसांनी वीस जणांना अटक केली. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी श्रीकांत महाडिक यांचाही समावेश आहे.तालुक्यातील शिपूर येथे मिरज ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.


तालुक्यातील शिपूर येथे प्रत्येकवर्षी पारंपरिक पद्धतीने हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात पालखी आणि जन्मकाळ सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. प्रथेप्रमाणे वीणा उभारुन हनुमान नामाचा गजर करीत फुले टाकून जन्मकाळ झाल्यानंतर पालखी मिरवणूक काढली जाते. याशिवाय विविध कार्यक्रमांनी हा1 सण साजरा केला जातो. परंतु संपूर्ण देशासह राज्यात कोरोना साथीमुळे संचार बंदी आणि जमावबंदी चा आदेश लागू केला आहे. त्यामुळे गावोगावच्या यात्रा, ऊरुस, सण, लग्न सोहळे, अन्य धार्मिक आणी खासगी कार्यक्रमांसह आठवडा बाजारांवरही शासनाने बंदी घातली आहे. या निर्णयास अनुसरून शिपूर येथील सर्व संबंधितांना पोलीस पाटील, मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यासह प्रशासनाने हनुमान जयंतीचे कोणतेही सार्वत्रिक कार्यक्रम घेऊ नयेत घेतल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाची नोटीस कार्यक्रमाच्या सर्व संयोजकांना दिली होती.

हनुमान जयंतीचे कार्यक्रम होणार नाहीत असे स्पष्ट बजावून सांगितले असतानाही गांवातील काही नागरिकांनी दरवर्षाची परंपरा आहे म्हणून प्रथेप्रमाणे पूजा, पालखी,जन्मकाळ सोहळा साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत एकत्र येऊन पालखी सोहळ्याचा कार्यक्रम घेतला याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी या कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या प्रमुख वीस जणांना अटक केली.यामध्ये पोपट तुकाराम राम बाबर,शहाजी हरी बाबर,सुशांत मारुती शिंदे,राजाराम महादेव शिंदे,संजय ज्ञानदेव गुरव,रमेश नारायण देसाई,नंदकुमार भास्कर बाबर,सयाजीराव शिवाजी सूर्यवंशी,आनंदा घनश्याम गुरव,बबन महादेव शिंदे तात्यासो एकनाथ सूर्यवंशी,भारत काशिनाथ चव्हाण, अरुण ज्ञानदेव गुरव, सुरेश मारुती चव्हाण, बजरंग पांडुरंग कदम, मधुकर तात्यासो देसाई, धनाजी गोविंद देसाई, राजकुमार विजय बाबर, आणि महादेव शिवाजी देसाई यांचा समावेश आहे.या घटनेनंतर हनुमान जयंती दिवशीच हनुमान मंदीराला कुलुप लावण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com