कऱ्हाडच्या तेवीस रस्त्यास दोन कोटींची मंजूरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पालिकेच्या मासिक बैठकीत शहरांतर्गत विविध रस्त्यांसाठी विशेष व सर्वसाधारण अनुदानातून दोन कोटी 47 लाख 68 हजरांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कऱ्हाड : शहरातील सुमारे बावीस रस्त्यांसाठी सुमारे दोन कोटी 47 लाखांच्या निधीस पालिकेच्या मासिक बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यात विशेष रस्ता अनुदात वाढिव हद्दवाढ भागातील आठ रस्त्यांचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी चार लाख 62 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शहरातंर्गतसह हद्दवाढ भागातील विविध रस्ते आता चकाचक होणार आहे.

विशेष रस्ता अनुदानातून अठरा तर सर्वसाधारण अनुदानातून पाच रस्त्यांची कामे पालिका हाती घेणार आहे. त्याची निवीदा प्रक्रीया लवकरच घेवून प्रत्यक्ष कामांस प्रांरभ करण्याच्या सुचना यावेळी विविध नगरसेवकांनी मांडल्या. रस्त्याशिवाय अन्य विविध पन्नास विषयांस एकमताने मंजूरी मिळाली. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. 

पालिकेच्या मासिक बैठकीत शहरांतर्गत विविध रस्त्यांसाठी विशेष व सर्वसाधारण अनुदानातून दोन कोटी 47 लाख 68 हजरांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी विषय मांडला. त्यात विशेष अनुदानातून पालिका अठरा रस्ते करणार आहे. हद्दवाढ भागातील सुमारे आठ रस्त्यांना पालिकेने सभेत मंजूरी दिली आहे. त्यासाठी सुमारे एक कोटींच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. वाढीव हद्दवाढ भागात राधाकृष्ण कॉलनीतील मुख्य रस्त्यास नऊ लाख एक हजार, सुमंगलनगर येथील रस्त्यास अकरा लाख 15 हजार, गुरूदक्षिण कॉलनीतील रस्त्यास आठ लाख 23 हजार 115, कृष्णा एकनाथ कॉलनीत रस्त्यास 18 लाख 43 हजार 177, त्रिमुर्ती कॉलनीत रस्त्यास दहा लाख 89 हजार, वाढीव हद्दीतील रस्त्याच्या सर्व्हे क्रमांक 71 मधील रस्ता खडीकरणास 18 लाख 23 हजार, कार्वे नाका येथील गणपती मंदीरासमोरील रस्त्यासाठी सात लाख 12 हजार व गोळेश्वर रस्ता येथील अरूणोदय कॉलनीत रस्त्यास 18 लाख 11 हजारांचा निधी मंजूर झाला आहे.

शहरातंर्गत बसस्थानकानावरील राज मेडीकल ते डॉ. बापुजी साळुंखे यांच्या पुतळ्याकडील रस्त्यास अकरा लाक 54 हजार, गुरूवार पेठेतील श्री. लिपारे ते श्री. चंदुगडे यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यास सात लाख 38 हजार 784, शनिवार पेठेत कोळेकर हॉस्पीटलनजीकच्या रस्त्यास सात लाख 80 हजार, शनिवार पेठेत कगदी आईस फॅक्टरी लगतच्या रस्त्यास सहा लाख 89 हजार, शनिवार पेठेतील पंकज ऑटो केअर लगतच्या रस्त्यास सहा लाख 38 हजार, सोमवार पेठेतील पाण्याची टाकी रस्त्यास एक लाख 46 हजार तर शुक्रवार पेठेतील पेंढारकर पुतळ्यापासूनच्या रस्त्यास 14 लाख 34 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याशिवाय सर्वसाधरम अुदानातून पन्नास लाखांचा निधी रस्त्याच्या कामास मंजूर आहे. त्यात एलआयसी कार्यालय, विजय दिवस चौक, रूक्मिणीनगर, सोमवार पेठेतून वीट भट्टीकडे जाणारा रस्ता व मंगळवार पेठेतील पाकिजा चिकन शेजारहून जाणाऱ्या रस्त्याचा त्यात समावेश आहे. रस्त्यांच्या विषयाशिवाय अन्य पन्नास विषयांना एकमताने मंजूरी देण्यात आली

भुयारी गटारीच्या कर्जावर उपाध्यक्षांचा खुलासा -

राज्यस्तरीय भुयारी गटार योजनेच्या कर्जावरून अर्थसंकल्पीय सभेत नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, असा सवाल लोकशाही आघाडीचे नेते सौरभ पाटील यांनी केला होता. त्याचा आजच्या सभेत उपाध्यक्ष जयवंत पाटील यांनी खुलासा केला. ते म्हणाले, भुयारी गटार योजनेसाठी 18 ऑगस्टला स्पॉफ्ट लोन नऊ कोटी 80 हजार घेतले होते. त्यापैकी नऊ कोटी 79 लाख 90 हजार रक्कम 10 सप्टेंबरला मुदत ठेव म्हणून 6.25 टक्के व्याजाने 180 दिवसांच्या मुदतीसाठी ठेवले होते. त्याची मुदत नऊ मार्च 2019 रोजी संपत आहे. त्यानंतर पालिकेच्या खात्यावर दहा कोटी दहा लाख दहा 239 रूपये जमा होणार आहेत. पिलेकेस टीडीएस वजा जाता 27 लाखांचे व्याज मिळणार आहे. त्याच कर्जात चार कोटी 20 लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्याच दिवशी ती रक्कम 6.25 टक्के व्याजाने 180 दिवसांसाठी ठेवली होती. त्याची मुदत 23 सप्टेंबर 2019 रोजी संपत आहे. त्यानंतर पालिकेच्या खात्यावर अकरा लाख 65 हजारांचे व्याज जमा होत आहे. सहा महिन्यात 38 लाख 65 हजारांचे व्याज मिळणार आहे. पुढील वर्षात 80 लाख इतकी व्याजाची रक्कम जमा होणे अपेक्षीत आहे. त्या सगळ्यातून पालिकेचा आर्थिक फायदा होणार आहे. 

Web Title: Twenty three roads of Karhad have got clearance of two crores