जेलमधुन पळुन गेलेल्या आरोपीं पैकी दोन पुन्हा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पेठवडगांव : शाहुवाडी पोलिस ठाण्याच्या जेलमधुन पळुन गेलेले चार संशयीत आरोपींपैकी दोन आरोपींना वडगांव पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करीत, झडप घालुन पकडण्यात यश मिळवले. दोन पोलिसांच्या धाडसामुळे चोविस तासात अरोपींना अटक करण्यात आले. हि कारवाई किणी टोल नाका येथे करण्यात आली.

पेठवडगांव : शाहुवाडी पोलिस ठाण्याच्या जेलमधुन पळुन गेलेले चार संशयीत आरोपींपैकी दोन आरोपींना वडगांव पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. आरोपींना फिल्मी स्टाईलमध्ये पाठलाग करीत, झडप घालुन पकडण्यात यश मिळवले. दोन पोलिसांच्या धाडसामुळे चोविस तासात अरोपींना अटक करण्यात आले. हि कारवाई किणी टोल नाका येथे करण्यात आली.

 विराज गणेश कारंडे (वय. १९, दरवेश पाडळी, ता. हातकणंगले), ओंकार महेश सुर्यवंशी (वय.१९ , कासेगांव, ता. वाळवा. जि. सांगली) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. शाहुवाडी पोलिस ठाण्याचे गज वाकवुन चौघे अट्टल गुन्हेगार पहाटे पळुन जाण्यात यशस्वी झाले होते. या चौघांपैकी दोघेजन वडगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची गोपनीय महिती वडगांव पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन आज रात्री पासुन पोलिसांनी गस्त वाढवले होते. पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन देशमुख व काही पोलिसांनी मिळुन रात्रीच्यावेळी महामार्गावरुन यलुर फाटा ते इटकर, लाडेगांव, शिराळा, कासेगांव मार्गे महामार्ग असे तपास करीत होते. यावेळी एक खाजगी कार घेवुन ते गुन्हेगारांचा शोध घेत होते. अखेर ते कुठेही मिळाले नसल्यामुळे पहाटे पोलिस ठाण्यात आले. परंतु सकाळी साडे सातच्या सुमारास खबऱ्याच्या माहितीवरुन ते एका ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस निरीक्षक गवारी व दोन पोलिस मिळुन एक खाजगी कार घेवुन सांगितलेल्या ठिकाणाकडे रवाना झाले. 

तांदुळवाडी येथील विठ्ठल-रकमाई मंदिरात दोन तरुण तोंडाला रुमाल बांधुन बसल्याचे समजल्यामुळे पोलिस घटनास्थळी गेले. दरम्यान ते दोघे महामार्गावरुन मोटरसायकलवरुन किणी गावाच्या दिशेने गेल्याचे समजले. यानंतर महामार्गावर शोध मोहिम घेत असताना ते जातानाची पोलिसांनी खात्री केली. यानंतर पोलिस निरीक्षक गवारी यांनी खाजगी कारच्या माध्यमातुन पुढे जावुन किणी टोल नाक्यावर सापळा रचला व दोन पोलिसांना एका नागरिकांची मोटरसायकल घेवुन त्या दोघांच्या मागे पाठवले. दरम्यान किणी टोल नाका आल्यानंतर दोघांना टोल नाक्यावर गर्दी पाहुन ते परत फिरले. यावेळी दोन्ही अरोपी हतातुन जाण्याच्या मार्गात असल्याचे पाहुन पोलिस कॉन्स्टेबल संदिप गायकवाड व पोलिस नाईक बाबासो दुकाने या दोघांनी जीवाची पर्वा नकरता चालु गाडीवरुन दोघांच्या अंगावर झडप घालुन त्यांना खाली पाडले. यावेळी दोघांच्यात झटा-पट झाली. तरीही दोघांना पकडुन ठेवले. तोपर्यत किणी टोल नाक्यावरील पोलिस मदतीस आले आणि दोघांना अटक केली. या घटनेनंतर शाहुवाडी विभागाचे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील यांनी वडगांव पोलिस ठाण्यास भेट दिली. यशस्वी कामगीरी करणारे अधिकारी व पोलिसांचे अभिनंदन केले. या अरोपींना अटक करुन ते शाहुवाडीचे पोलिस उपनिरीक्षक एस.बी.देवणे यांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: two accused who escaped from the jail again detained