"एनआयई'ने अनुभवला अडीच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

कोल्हापूर -  येथील श्रीराम विद्यालय शाळेतील एनआयई सभासदांनी नुकतीच टाऊन हॉल वस्तू संग्रहालयाला भेट दिली. यानिमित्ताने अडीच हजार वर्षांपूर्वींचा कोल्हापूरचा समृद्ध इतिहास विद्यार्थ्यांनी अनुभवला. एनआयई परिवारातर्फे कार्यशाळांसह विविध ठिकाणी क्षेत्र भेटींचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत टाऊन हॉलला भेट देण्यात आली. 

विद्यार्थ्यांना आजवर इतिहास हा फक्त पुस्तकात वाचूनच अनुभवावा लागतो. त्यामुळे त्यांना इतिहासाच्या साक्षीदार असणाऱ्या काही गोष्टी दाखवण्यासाठी टाऊन हॉलला भेट देण्यात आली. संग्रहालयातील विविध शिल्प, शस्त्रे, विविध मूर्ती, ताम्रपट आदी गोष्टींमुळे तत्कालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती काय होती, याबाबत विद्यार्थ्यांनी जाणून घेतले. ब्रह्मपुरी उत्खननावेळी सापडलेली अडीच हजार वर्षांपूर्वीची ग्रीक समुद्रदेवतेची मूर्ती पाहून तर विद्यार्थी थबकलेच. मात्र त्या काळापासून कोल्हापूर जगाशी जोडले गेल्याच्या इतिहासाची त्यांना माहिती मिळाली. एनआयई सम्वयक सुमित कदम यांनी संयोजन केले. 

Web Title: Two and a half thousand years of history, has experienced NIE