उष्म्यामुळे अंडी उत्पादनात अडीच ते तीन लाखांची घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

विटा - खानापूर तालुक्‍यात वाढत्या तापमानाचा पोल्ट्री व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. अंडी उत्पादनात रोज अडीच-तीन लाख अंड्यांची घट होत आहे. दरही कमी मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांचे मृत्यू टाळण्यासाठी पोल्ट्रीधारक विविध उपाययोजना करीत आहेत. 

लाखोंची गुंतवणूक करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी अनेक वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय सुरू केले. अंड्याला दर नाही, दुष्काळ, वाढता उन्हाळा याचा व्यावसायिकांना सामना करावा लागत आहे. 

रोजचे नऊ लाख अंडी उत्पादन साडेसहा लाखांवर आले. वाढत्या तापमानाचा परिणाम होऊ लागला आहे. अंडी दरातही घसरण झाली आहे. एका अंड्याला ३.४० रुपये दर आहे. ७० पैसे कमिशन वजा जाता २.७० रुपये उत्पादकांच्या हाती मिळत आहेत. अंड्याला मागणी आहे, दर नाही, अशी स्थिती आहे. मात्र हीच अंडी खासगी दुकानातून पाच रुपये दराने विक्री केली जात आहे. खासगी व्यापारी मालामाल व अंडी उत्पादक कंगाल अशी अवस्था उत्पादकांची झाली आहे.

नेक (अंडी समन्वय) च्या धोरणाबद्दल पोल्ट्रीधारकांतून शंका उत्पन्न होऊ लागली आहे. नेककडून अंड्याच्या दरात चढ-उतार केले जाताहेत. पोल्ट्रीधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे. ‘नेक’ने अंड्याच्या दरात चढ-उतार न करता दर स्थिर ठेवावेत, अशी मागणी आहे.

वाढत्या तापमानामुळे अंडी उत्पादन कमी होत असले तरी बाजारात अंड्याला मागणी आहे. नेक (अंडी समन्वय समिती) ने अंड्याचे दर जाणूनबुजून पाडलेत. पोल्ट्री उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. ‘नेक’ने हे चुकीचे धोरण बंद करून प्रतिअंड्याला चार रुपये दर द्यावा. पोल्ट्रीधारकांना किमान साडेतीन रुपये हाती मिळतील.
- शत्रुघ्न जाधव,पोल्ट्री उत्पादक संघटनेचे नेते

कोंबड्या वाचवायला उपाय
वाढत्या तापमानापासून कोंबड्या वाचवण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्याला चुना लावणे, शेडमध्ये तुषार सिंचनाचा वापर, कोंबड्यांना गारवा मिळावा यासाठी शेडला आतून रंग देणे, असे उपाय केले जात आहेत.

Web Title: Two and a half to three lakh reduction in egg production