केडगावात तोडफोडप्रकरणी आणखी दोन जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर दगडफेक व तोडफोड केल्याप्रकरणी आज आणखी दोन संशयित आरोपी शिवसैनिक कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. रवी विलास वाकळे (वय 29, रा. सावेडी) व मदन संपत आढाव (वय 33, रा. बोल्हेगाव) अशी त्यांची नावे आहेत.

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर संतप्त शिवसैनिक व जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून मोडतोड केली, तसेच अन्य वाहनांसह घरांवर दगडफेक केली. याबाबत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह 600 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांपैकी आतापर्यंत 17 जणांना अटक होऊन त्यांना जामीन मिळाला आहे.

Web Title: two arrested in kedgaon damage case crime