गांधीनगरातील दोघा भावांना व्यापारी लूटप्रकरणी अटक

गांधीनगरातील दोघा भावांना व्यापारी लूटप्रकरणी अटक

कोल्हापूर - रुईकर कॉलनीसमोर व्यापाऱ्याला मारहाण करून लुटणाऱ्या दोन संशयित सख्ख्या भावांना शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून गांधीनगरातून अटक केली. कैलाश नारायणदास सुंदराणी (वय २५) व त्याचा भाऊ सागर (दोघे रा. गांधीनगर) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, की गांधीनगर येथील प्रसिद्ध व्यापारी शामलाल अरतमल बचराणी १८ ऑक्‍टोबर २०१८ ला रुईकर कॉलनीसमोरील हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेलसमोरील मोकळ्या जागेत त्यांना पाच ते सहा जणांनी लाकडी बॅटने मारहाण केली. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व पैशांचे पाकीट असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज लुटून नेला होता. याबाबत बचराणी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार गुन्हा दाखल झाला; पण त्यानंतर लुटारू गायब होते. यातील प्रमुख दोन संशयित गांधीनगर येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांना रात्रीच्या गस्तीवेळी मिळाली. त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाईस सुरवात केली.

दोघे  संशयित घरात लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे कैलाश व सागर सुंदराणी असल्याचे सांगितले. तपासादरम्यान संशयित कैलाशवर १७ गुन्हे दाखल असून, सागरवरही गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले. 

दरवाजा तोडून कारवाई...
लुटमारीतील संशयित कैलाश व सागर गांधीनगरात असल्याचे समजले. घराजवळ जाऊन जोरजोरात हाका मारल्या. पण, त्याला घरच्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी घरात कोणी नसल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या वेळी दोघे संशयित बाथरूमवरील टाकीजवळ लपले होते. दोघांना ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक मोरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com