राज्यात दोन अन्‌ केंद्रात एक कॅबिनेट - आठवले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती; परंतु मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली.

सोलापूर - रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती; परंतु मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून माघार घेतली, असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आज सोलापुरात केला. 

वंचित बहुजन आघाडीचा सर्वाधिक फायदा भाजप-शिवसेना-रिपाइं युतीलाच होईल. राज्यातील विधानसभा निवडणुकीत रिपांइला आठ ते 10 जागा द्याव्यात, अशी मागणी भाजपकडे केली आहे. दरम्यान, सत्तेसाठी वंचित बहुजन आघाडीत गेलेले पदाधिकारी, कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर रिपाइंत येतील, असा विश्‍वास आठवले यांनी केला. दुष्काळी दौऱ्यानिमित्त आठवले सोलापुरात आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two cabinet ministers in the state and the center offered says Ramdas Athavale