करमाळ्यातील चार गावांसाठी दोन कोटी 82 लाखांची निधी

संतोष सिरसट
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

जिल्ह्यात झालेल्या उजनी प्रकल्पांमध्ये अनेक गावांचे स्थलांतर झाले आहे. त्याने अनेक गावे पुनर्वसित झाली आहेत. करमाळा तालुक्‍यातील अशा चार पुनर्वसित गावांच्या गावठाणामधील नागरी सुविधांसाठी दोन कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

ःसोलापूर- जिल्ह्यात झालेल्या उजनी प्रकल्पांमध्ये अनेक गावांचे स्थलांतर झाले आहे. त्याने अनेक गावे पुनर्वसित झाली आहेत. करमाळा तालुक्‍यातील अशा चार पुनर्वसित गावांच्या गावठाणामधील नागरी सुविधांसाठी दोन कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

उजनी कालवा विभाग क्रमांक आठच्या कार्यकारी अभियंत्यांनी या गावातील कामांच्या निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यासही सांगण्यात आले आहे. या निविदांसाठी पाटबंधारे विकास महामंडळाकडून परवानगी घेण्याची आवश्‍यकता नाही. हा निधी पुनर्वसन विभागाकडून दिला जाणार आहे. कविटगाव, पारेवाडी, गोयेगाव, केत्तूर नंबर एक या चार गावांसाठी हा निधी मंजूर झाला आहे.

कविटगाव येथे स्मशानभूमी पोच रस्ता व अंतर्गत खडीकरण रस्ता तयार करण्यासाठी 53 लाख 48 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पारेवाडी येथे स्मशानभूमी शेड, बोअरवेलसह स्मशानभूमी पोच रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छतागृह, ध्वजस्तंभासह, सिमेंट कॉंक्रिट गटार बांधणे या कामासाठी 47 लाख 85 हजार रुपये, गोयेगावसाठी स्मशानभूमी शेड, बोअरवेलसह स्मशानभूमी पोच रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छतागृह, ध्वजस्तंभासह, सिमेंट कॉंक्रिट गटार बांधणे, संरक्षक भिंत, अंतर्गत खडीकरण रस्ता तयार करणे या कामांसाठी 92 लाख 98 हजार तर केत्तूर नंबर एक या गावासाठी स्मशानभूमी शेड, बोअरवेलसह स्मशानभूमी पोच रस्ता, ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छतागृह, ध्वजस्तंभासह, सिमेंट कॉंक्रिट गटार बांधणे, संरक्षक भिंत, अंतर्गत खडीकरण रस्ता तयार करणे या कामासाठी 88 लाख 59 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांच्या निविदा काढून ती तत्काळ सुरू करण्याच्या सूचनाही कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

Web Title: Two cr 82 lakh fund for four villages in Karamala