सांगलीतील हरिपुरात दोन अजस्त्र मगरींचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

सांगली - कृष्णा नदीत उडी टाकल्यानंतर वाहून गेलेल्या युवतीचा शोध घेताना आयुष हेल्पलाईन टीमला आज हरिपूर (ता. मिरज) येथे कृष्णेच्या काठावर एकाच ठिकाणी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झाले. तसेच परिसरात पाच-सहा मगरी असल्याचे निदर्शनास आले. 

आयर्विन पुलावरून 8 जुलै रोजी सांगलीतील युवतीने उडी घेतल्याचा प्रकार काहींनी पाहिला. सदर युवतीचा गेले चार दिवस बोटीतून शोध सुरू आहे. सांगलीतून हरिपुरापर्यंत आज आयुष हेल्पलाईन टीमने शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू युवतीचा मृतदेह काही आढळला नाही. 

दरम्यान आज दुपारच्या सुमारास हरिपूर येथे कृष्णेच्या काठावर एकाच ठिकाणी दोन अजस्त्र मगरी काठावर पहुडलेल्या आढळल्या. तसेच या ठिकाणापासून आसपास पाच-सहा मगरींचे वास्तव्य टीमला आढळले. हरिपूर येथे यापूर्वीही मगरींचे दर्शन अधून-मधून होते. परंतू आज दुपारच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मगरी नदीकाठावर आल्याचे दिसले. नदीकाठावरील शेतापासून काही अंतरावरच या मगरी दिसल्या. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये काहींसे भितीचे वातावरण आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two Crocodile seen in Haripur in Sangli

टॅग्स