विमानतळाच्या सुविधेसाठी दोन कोटींची निविदा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

कोल्हापूर - विमानतळावर विद्युतीकरण आणि जनरेटर बसविण्याची सुमारे २ कोटींची निविदा एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या वतीने (एएआय) प्रसिद्ध केली आहे. २४ डिसेंबर अखेरपर्यंत त्यांनी निविदा भरण्याची अंतिम मुदत ठेवली आहे. एक ते दोन महिन्यांत विमानतळावर विद्युतीकरणाचे काम सुरू होईल. 

विमानसेवा सुरू करण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या सेवांची उपलब्धता करण्याची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी विमानतळ बंदिस्त करण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्याची ही निविदा प्रसिद्ध केली होती. १८ नोव्हेंबरला दिल्ली येथे झालेल्या विमानतळाच्या प्रश्‍नाबाबत बैठकीत विद्युतीकरणचा मुद्दा चर्चेत पुढे आला होता.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘दिल्लीतील बैठकीत हा मुद्दा मांडल्यानंतर त्याचा पाठपुरावा एएआयकडे सुरू होता. त्यांना याविषयी सूचना ही केली होती. विमानतळावर विद्युतीकरणाची अत्यंत गरज आहे. त्यासाठी त्याचे काम लवकर सुरू करण्याची विनंती केली. त्यानुसार एएआयने २८ नोव्हेंबरला यासाठीची निविदा प्रसिद्ध केली. १ कोटी ४२ लाख ५२ हजार ३६८ रुपयांच्या विद्युतीकरणाची निविदा प्रसिद्ध केली. त्याचबरोबर ४१ लाख ३३ हजार ५४८ रुपयांची निविदा जनरेटरसाठीही प्रसिद्ध केली आहे. २४ डिसेंबरअखेर या निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांतच याचे काम सुरू होईल. विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक सर्व बाबींची पूर्तता करण्याचे काम या अनुषंगाने सुरू आहे.

Web Title: Two crore for the convenience of the airport tender