संपामुळे दिवसात दोन कोटींचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

सातारा - विविध मागण्यांसाठी मध्यरात्री बारापासून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. सातारा विभागातील दोन हजार 443 बसच्या फेऱ्या ठप्प झाल्या. त्यामुळे विभागाचे सुमारे एक कोटी 91 लाख 51 हजार रुपयांचे नुकासन झाले. या संपामुळे बस स्थानकातील व्यवसायांवर झाल्याने त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांचेही हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी दुप्पट रक्कम आकारत फायदा करून घेतला. 

सातारा - विविध मागण्यांसाठी मध्यरात्री बारापासून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. सातारा विभागातील दोन हजार 443 बसच्या फेऱ्या ठप्प झाल्या. त्यामुळे विभागाचे सुमारे एक कोटी 91 लाख 51 हजार रुपयांचे नुकासन झाले. या संपामुळे बस स्थानकातील व्यवसायांवर झाल्याने त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांचेही हाल झाले. खासगी वाहतूकदारांनी दुप्पट रक्कम आकारत फायदा करून घेतला. 

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना (संलग्न आयटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) आदी संघटनांतर्फे हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात चालक, वाहकांसह कार्यशाळेतील कर्मचारीही सहभागी झाले आहेत. संपास मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला असला, तरी आज सकाळी सहाच्या सुमारापासून त्याचा सर्वाधिक फटका नोकरदार, विद्यार्थ्यांना बसला. सकाळी बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढू लागली होती. मात्र, बस बंद असल्याने त्यांचे हाल झाले. तासन्‌तास प्रवाशी बस स्थानकातच ताटकळत बसले होते. सातारा मुख्य बस स्थनाकातून "शिवशाही' वगळता सर्व बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. "शिवशाही' बसलाही महामार्गापर्यंत पोलिस संरक्षणातून सोडण्यात येत होते. 

अचानक पुकारण्यात आलेल्या संपामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. याबाबत प्रवाशांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी देण्यात यावी, कामगार, कर्मचाऱ्यांसाठी सुधारित वेतन करार व्हावा, कर्मचारी आणि कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारल्याची माहिती संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली. 

एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांच्या कार्यालयातून जिल्ह्यातील विविध बस स्थानकातून दिवसभराची स्थितीचा आढावा घेण्याचे कामकाज सुरू होते. मध्यरात्री बारापासून ते सायंकाळी सहापर्यंत दोन हजार 443 फेऱ्या ठप्प झाल्याची माहिती विभाग नियंत्रक कार्यालयातून देण्यात आली. 

खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट 
बस स्थानकाच्या बाहेर खासगी वाहतूकदारांनी आपपल्या बस उभ्या केल्या होत्या. या बस कोल्हापूर, पुणे, मुंबईला जाण्यासाठी सज्ज होत्या. पुण्याला जाण्यासाठी प्रती प्रवासी 250 रुपये आकारले जात होते. वडाप वाहतूकही तेजीत होती. "वडाप'चालकांना जादा दर आकारले नाहीत, मात्र, लांब पल्ल्याच्या प्रवाशांना जादा दर आकारूनच वाहतूक सुरू होती. 

एसटी संप - दिवसभरातील स्थिती... 
- एसटी संपाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद 
- जिल्ह्यातील सर्व आगारांतील बहुतांश कर्मचारी संपात सहभागी 
- दिवसभरातील अडीच हजार फेऱ्या रद्द 
- मोठ्या शहरांतील बस स्थानकात पोलिस तैनात 
- साताऱ्यातून पोलिस बंदोबस्तात "शिवशाही'च्या फेऱ्या 
- अचानक झालेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल 
- मुंबई- पुण्याला जाण्यासाठी दुप्पट दराने खासगी वाहनांतून वाहतूक 

Web Title: Two crore losses a day due to the ST employees strike