शिष्यवृत्तीतून दरवर्षी दोन कोटींचा लाभ

शिष्यवृत्तीतून दरवर्षी दोन कोटींचा लाभ

सोळांकूर - केंद्र शासनाची एनएमएमएस शिष्यवृत्ती इयत्ता आठवीत शिकणाऱ्या देशभरातील अर्थिक दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरली आहे. राज्याला ११६८२ विद्यार्थ्यांचा कोटा आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी ४४२ विद्यार्थ्यांचा कोटा आहे. या शिष्यवृत्तीसाठी यावर्षी १६०१ विद्यार्थी पात्र झाले आहेत. प्रत्येकी वार्षिक बारा हजारप्रमाणे एक कोटी ९२ लाख रुपये मिळणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याने शिष्यवृत्तीत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्यात कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, सातारा, सांगली जिल्ह्यांचे काम अग्रेसर आहे. 

केंद्रशासनाने २००७-०८ पासून इयत्ता नववीसाठी ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी आहे. त्यांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जात असे. दुसऱ्या वर्षी ही परीक्षा आठवी वर्गाला सुरू केली. दरमहा ५०० रुपये, असे वार्षिक सहा हजार रुपये रक्कम मिळत असे. आता ही रक्कम दुप्पट केली आहे. या वर्षीपासून ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते.
महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्तीमध्ये देशात अग्रेसर आहे. सध्या पाचवी आणि आठवीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून गेल्या वर्षीपासून परीक्षा घेतली जाते, मात्र राज्य, जिल्हा, ग्रामीण अशी शिष्यवृत्ती रकमेची विभागणी असते.

ज्यामध्ये मासिक ५०, ७५, १००, १५० रुपये या प्रमाणात शिष्यवृत्ती वाटप होते. त्यामुळे एका पात्र विद्यार्थ्याला वार्षिक १५०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. याची तुलना आता पालक करत आहेत. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी एनएमएमएस शिष्यवृत्तीचा मोठा आधार ठरली 

आघाडीवरील तालुके
राधानगरी तालुका सुरवातीपासून जिल्ह्यात आघाडीवर आहे. तालुक्‍यातील मारुतीराव वारके विद्यालय तुरंबे, आमदार नामदेवराव भोईटे विद्यालय कसबा वाळवे, शिवाजीराव खोराटे विद्यालय सरवडे, किसनराव मोरे हायस्कूल सरवडे, नागेश्‍वर हायस्कूल राशिवडे या शाळांचे सरासरी १७० पेक्षा अधिक विद्यार्थी पात्र ठरल्याने त्यांची द्विशतकाकडे वाटचाल सुरू आहे.
भुदरगड तालुक्‍यातून प. बा. पाटील विद्यालय मुदाळ जिल्ह्यात आघाडीवर आहे, तर नाधवडे हायस्कूलचे काम कौतुकास्पद आहे. कागल तालुक्‍यातून शिवराज विद्यालय मुरगूडनेही परीक्षेत लक्षवेधी काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com