अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना उद्या, परवा सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यातील पूर परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या व परवा (ता. 6 व 7) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यासंदर्भातील आदेश आज काढल्याने शिक्षण उपसंचालकांनी तशा सुचना शाळांना लेखी स्वरूपात दिल्या आहेत. 

शहरातील काही प्रमुख मार्गावर पाणी आल्याने हे मार्ग बंद आहेत. नदी व जयंती नाल्याच्या काठावर असलेल्या अनेक घरे व अपार्टमेंटमध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर होत चालली आहे. मुलांना शाळेत जाणेही शक्‍य नाही, काही शाळांच्या आवारात गुडघाभर पाणी साचले आहे. या परिस्थितीचा विचार करून आज शाळांना सुट्टी दिली होती. हीच परिस्थिती अजूनही कायम आहे.

किंबहुना पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्‍यता असल्याने मंगळवार व बुधवारीही शाळांना सुट्टी देण्याचे आदेश दिले आहे. येणाऱ्या दोन दिवसांत पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी यासंदर्भात काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two days School closed in Kolhapur due to Heavy rains