खंबाटकी घाटात पुन्हा भीषण अपघात; दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

खंडाळा : सातारा- पुणे महामार्गावरील खंबाटकी घाटातील अपघातासाठी कुप्रसिध्द असलेल्या 'एस' आकाराच्या वळणावर मोटारसायकल घेऊन भरधाव वेगात जात असताना समोरील अज्ञात वाहनास पाठीमागून जोराची धडक देऊन झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात सुरुर (ता.वाई) येथील दोघे तरुण जागेवरच ठार झाले.

मोटारसायकल चालक निलेश मानाजी पवार (वय 32) व लहुराज हणमंत चव्हाण (वय 30) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले कि, सुरूर येथील ऊसाच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करणारे लहुराज चव्हाण व निलेश भवर हे म्हावशी खंडाळा साखर कारखान्यावर जेवणाचा डबा घेऊन मोटारसायकलवरुन जात होते.

अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोटारसायकल (एम-एच 11 ए एस 6285) चालक निलेश भवर (वय 32 रा. सुरुर) यांच्या डोक्यास जबर मार लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला; तर लहुराज चव्हाण याच्याही डोक्यास मार  लागला. त्यांना खंडाळा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. रूग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.  

अपघातास्थळी दोघांच्याही डोक्यास जबर मार लागुन मोठा रक्तस्त्राव झाला होता. निलेशला एक लहान मुलगा व मुलगी आहे. दरम्यान शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची फिर्याद चारुदत्त प्रकाश चव्हाण (रा. सुरुर) यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड करीत आहे.

Web Title: Two dead in an accident at khambatki ghat