मंगळवेढ्यात दोन मृतदेह आढळल्यामुळे खळबळ

हुकूम मुलाणी
रविवार, 20 जानेवारी 2019

मंगळवेढा : शहराजवळील खोमनाळ रस्त्यावर 27 वर्षे तरुणाचा व जालीहाळ येथेही अंदाजे चाळीस वर्ष इसमाचा मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली  आहे. खोमनाळ रस्त्यावरील मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून समाधान उत्तम पाटील (वय 27 रा. सलगर खुर्द ) असे याचे नाव असून जालीहाळ येथील मृत इसमाचे नाव अद्याप स्पष्ट झाले नाही पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

जालीहाळचे सरपंच सचिन चौगुले याच्या रस्त्यालगतच्या शेतातील बांधात काल रात्री सापडला. तो मृतदेह चाळीस वयाच्या दरम्यान असून कुजलेल्या अवस्थेत आढळून आला तर, खोमनाळ रस्त्यावर आढळलेला मृतदेह सलगर  तरुणाचा असल्याने ओळख पटली आहे. नातेवाईकांना कळविण्यात आले आहे.  तो काल घरातून रागात निघून गेला होता. दोन्हीही मृतदेह सध्या ग्रामीण रूग्णालयात ठेवले असून त्याची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद म्हणून पोलिसात नोंद झाली आहे.

 ''एका मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले आहे दुसरा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे ओळख पटवण्यात अडचण येत आहे तरीही आम्ही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहे.''  
- अनिल गाडे, पोलीस निरीक्षक

Web Title: two dead bodies were found near mangalwedha