अपघातात दोघा प्रवाशांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

पांगरी (जि. सोलापूर) - अतिवेगात आलेल्या ट्रॅव्हल बस व कंटनेरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवाशी जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री बार्शी-लातूर रस्त्यावर कुसळंब (ता. बार्शी) जवळील एलपीजी गॅस पंपासमोर घडली. रमेश सुदाम गंभीरे (रा. वागदरी, ता. रेणापूर) व शिवमुर्ती बिभीषण कांबळे (रा. गुजरागा, ता. निलंगा) असे मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. जखमींना बार्शीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत कंटेनरचालक गफुर उमरसाब मासुदार यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Web Title: two death in accident