जीप-ट्रकच्या अपघातात पुण्यातील दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

नगर-मनमाड महामार्गावर शिंगणापूर फाट्याजवळ जीप व ट्रकच्या भीषण अपघातात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला; तर सहा जण गंभीर जखमी झाले. जीपचा पुढील टायर फुटून ती दुभाजकावर आदळून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. रविवारी (ता. 19) साडेचार वाजता हा अपघात झाला.

राहुरी - नगर-मनमाड महामार्गावर शिंगणापूर फाट्याजवळ जीप व ट्रकच्या भीषण अपघातात पुण्यातील दोघांचा मृत्यू झाला; तर सहा जण गंभीर जखमी झाले. जीपचा पुढील टायर फुटून ती दुभाजकावर आदळून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. रविवारी (ता. 19) साडेचार वाजता हा अपघात झाला.

राहुरीहून नगरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या जीपचा (एमएच 12 आरके 5830) पुढील टायर अचानक फुटला. त्यामुळे ती रस्ता दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला (टीएन 28 एआर 5830) धडकली.

अपघातात जीपचा चक्काचूर झाला. जीपमधील सहा प्रवाशांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. अन्य सात जणांना नगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पुरुषांचा समावेश आहे. जखमींमध्ये चार महिला व दोन पुरुष आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

मृत पुण्याचे रहिवासी
अपघातात मृत्युमुखी पडलेले दोघे खडकवाडी (पुणे) येथील रहिवासी असून, ते चौधरी कुटुंबातील आहेत. तसेच, जीप ओमप्रकाश (रा. लोहगाव) या व्यक्तीच्या नावावर आहे. हे परप्रांतीय कुटुंब असावे आणि ते पुण्यात राहत असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. मात्र, याबाबत अधिकृत माहिती उशिरापर्यंत समजली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Death in Jeep Truck Accident