esakal | दोन जिवाभावाचे मित्र बनले शत्रू अन...
sakal

बोलून बातमी शोधा

दोन जिवाभावाचे मित्र बनले शत्रू अन...

उंबरगाव येथील दडसवस्तीवर दोन जीवाभावाच्या मित्रात आर्थिक आणि क्रेटा गाडीच्या वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली.

दोन जिवाभावाचे मित्र बनले शत्रू अन...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

आटपाडी ः उंबरगाव येथील दडसवस्तीवर दोन जीवाभावाच्या मित्रात आर्थिक आणि क्रेटा गाडीच्या वादातून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्हीकडचे तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. 

उंबरगाव येथील बंडू कोंडीबा धडस आणि शिवाजी बाळू गाढवे हे दोघे जीवाभावाचे मित्र होते. हे दोघे विविध प्रकारचे एकत्र व्यावसायिक करत होते. त्यांचे आर्थिक व्यवहारही होते. काल रात्री साडेदहा वाजता बंडू धडस दोन मित्रासोबत शिवाजी गाढवे यांच्या घरी गेला. तेथे त्याने स्वतः घेतलेली क्रेटा गाडी माझ्या नावावर करून दे अन्यथा घरात असलेले दोन लाख रुपये दे म्हणून शिवाजी गाढवे याच्यासोबत भांडण काढले.

शिवाजी गाढवे याने गाडी नावावर करून देण्यात विरोध केला. यातून भांडण वाढत गेले आणि हाणामारी सुरू झाली. या मारामारीमध्ये काठी कुऱ्हाड याचा वापर केला. यामध्ये शिवाजी गाढवे आणि त्यांची आई चांगुना गाढवे या गंभीर जखमी झाल्या. तर बंडू धडस हेही गंभीर जखमी झाले.

या मारहाणीनंतर बंडू धड्याच्या दोन्ही मित्रांनी घरात ठेवलेले दोन लाख रुपये, 80 हजार रुपयांचे चार तोळे सोने जबरदस्तीने पळवून नेले. जाताना अंगणात असलेल्या ट्रकाची काच फोडून वीस हजारांचे नुकसानही केले. याबाबत दोन्ही बाजूंनी क्रेटा गाडी नावावर करून दे आणि घरात असलेले पैसे उसने दे म्हणून मारहाण केल्याची परस्परविरोधी फिर्यादी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केल्या आहेत. 

loading image