दोन आरोग्यसेविकांचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कऱ्हाड - कोयना विभागातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रातील पूनम फारूक मुजावर व रेणुका भोसले या दोन आरोग्य सेविकांनी प्रमाणापेक्षा जास्त औषधाच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. रोजच्या कामावरून वाद झाल्याने दोघींनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यातील पूनम यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार शहर पोलिसांत डॉ. समीर वाळवेकर यांनी दिली. 

पोलिसांनी सांगितले, की पूनम व रेणुका यांच्यात दैनंदिन कामवरून काल वाद झाला. त्यातून दोघींनीही औषधाच्या अधिक प्रमाणात गोळ्या खाल्ल्या. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना कृष्णा रुग्णालयात दाखल केले. पूनम यांच्या नातेवाइकांनी डॉ. वाळवेकर यांना धक्काबुक्की केल्याची तक्रार शहर पोलिसात दाखल झाली आहे. 

Web Title: Two health workers attempt suicide

टॅग्स