'पीएलडी'साठी तब्बल दोनशे पोलिस कर्मचारी तैनात

Two hundred police personnel deployed for PLD
Two hundred police personnel deployed for PLD

बेळगाव : राजकीयदृष्या प्रतिष्ठेची ठरलेल्या भू-विकास बँकेच्या (पीएलडी) निवडणुकीसाठी तब्बल दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शुक्रवारी (ता.7) पीएलडी बॅंक परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडल्याने सगळ्यानीच सुटकेचा निश्‍वास सोडला. 

भू-विकास बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीवरुन गेल्या पंधरा दिवसांपासून राजकीय पक्षात घमासान सुरु आहे. विशेष करुन कॉंग्रेसच्या दोन गटात चांगलाच कलगीतुरा रंगाला होता. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व पालकमंत्री रमेश जारकिहोळी आमदार रमेश जारकिहोळीमध्ये वर्चस्ववादारुन राजकिय वादंग निर्माण झाला होता. निवडणुकीदरम्यान, एका संचालकाचे अपहरण झाल्याचे कारण पुढे करुन तहसीलदार तथा तालुका न्याय-दंडाधिकारी मंजुळा नायक यानी ही निवडणूक पुढे ढकलली होती. याकाळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे या निवडणुकीवरुन जिल्ह्यासह राज्यातील राजकारणात रंगत भरली होती. या सर्व घडमोडीदरम्यान, पोलिस खात्याची मात्र, तारांबळ उडाली.

अखेर आमदार हेब्बाळकर यानी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने शुक्रवारी (ता. 7) अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुक प्रक्रिया राबवावी, असा आदेश बजावला. त्यामुळे या काळात कोणत्याही प्रकारची वितरीत घटना घडून कायदा व सुव्यस्थेवर त्याचा परिणाम होउ नये, यासाठी पोलिस खात्याच्या वतीने खबरदारी घेण्यात आली.

महाव्दार रोड परिसरातील जुन्या पीबी रोडवरील पुलापासून कपिलेश्‍वर पुलापर्यंतच्या परिसरात आज सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत जमावबंदी जारी करण्यात आली. तसेच काल रात्रीपासूनच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.

तहसीलदार कार्यालयाला देखील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणुकीवर पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी स्वत: लक्ष ठेवून होते. निवडणूक बंदोबस्तासाठी चार सहाय्यक पोलिस आयुक्‍त, पंधरा पोलिस निरीक्षक, 10 पोलिस उपनिरीक्षक, तीन केएसआरपीच्या तुकड्या, दोन सीएआरच्या तुकड्या असा एकून दोनशे पोलीसांचा फौजफाटा तैणात करण्यात आला होता. त्यामुळे बॅंक परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com