जातेगाव घाटातील अपघात दोघे ठार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पारनेर - नगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्‍यातील जातेगाव घाटात आज सकाळी पावणे सातच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातात राहुरीचे प्रसाद रावसाहेब उंडे (वय 28) व भास्कर रंगनाथ डावखर (वय 61) जागीच ठार झाले. 

नगरहून पुण्याकडे जात असताना त्यांच्या कारला (एम.एच.17: एजे 2507) पाठीमागून येणाऱ्या मालट्रकने जोराची धडक दिल्याचे अपघात पाहणाऱ्यांनी सांगितले. मालट्रकने धडक दिल्याने उंडे यांची कार त्यांच्या पुढील लक्‍झरी बसला धडकली. या धडकेत कारमधील एअर बॅग उघडल्या तरी कारमधील प्रवासी वाचू शकले नाहीत.

मृत प्रसाद उंडे राहुरी येथील ज्येष्ठ विधिज्ञ रावसाहेब उंडे यांचे मुलगे आहेत. प्रसाद यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. पासपोर्टच्या कामासाठी उंडे व डावखर यांच्यासह पहाटे पाच वाजता राहुरीहून पुण्याकडे निघालेले होते. 

Web Title: Two killed in accident in district jategaon