दोन लाखांची अवैध दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

कऱ्हाड : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकुन जुळेवाडी (ता.कऱ्हाड) येथुन गोवा बनावटीचा अवैध दोन लाखांचा दारु साठा जप्त केला. याप्रकरणी गजानन दादु पवार (रा. जुळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक प्रताप बोडेकर यांनी आज दिली. 

जुळेवाडी येथे अवैध दारु साठा करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी यांनी जुळेवाडी येथे छापा टाकला. तेथे गोवा बनावटीच्या 288 बाटल्या आणि डिफेन्ससाठी असलेल्या 363 बाटल्या अशा 2 लाख 2  हजार 582 रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. कारवाई दरम्यान पवार हा पळुन गेला होता. त्याला आज ताब्यात घेण्यात आले असुन त्याच्यावर दारुबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे बोडेकर यांनी सांगितले. 

संबंधित कारवाई कोल्हापुर विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांच्या आदेशानुसार जिल्ह्याच्या अधिक्षका स्नेहलता श्रीकर यांच्या  मार्गदर्शनाखाली येथील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एस. बी. जंगम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.टी. बावकर, हवालदार एस. आर. बक्केवाड, बी. एस. माळी, एस. ए. लोहार, माने यांनी संबंधित कारवाई केली. बोडेकर तपास करत आहेत.

Web Title: Two lakh illegal liquor seized

टॅग्स