अक्कलकोट देवस्थानाकडून केरळसाठी दोन लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सोलापूर : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी आज दोन लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या माध्यमातून केरळ मुख्यमंत्री सहाय्यता करिता देण्यात आला. 

मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍याम मोरे, प्रवीण देशमुख, मनोज निकम, महेश शिर्के, राहुल इंडे, अरविंद पाटील आदी उपस्थित होते. 

विश्‍वस्त अमोलराजे भोसले म्हणाले, ज्या ज्यावेळी राष्ट्र, राज्य, जिल्हा तालुक्‍यावर नैसर्गिक आपत्ती येते त्या-त्यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून भरीव योगदान आजवर दिलेली आहे. गेल्या आठवड्यात केरळ राज्यात महाप्रलय झाला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जीवित हानी. लाखो लोक बेघर झाले, अशा लोकांना राज्य, परराज्य, परदेशातून मदतीचा हात पुढे सरसावले असताना खारीचा वाटा म्हणून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत देण्यात आली आहे. 

Web Title: Two lakhs help from Akkalkot Devasthana for Kerala