ट्रॅव्हल बस-कंटेनर अपघातात दोघांचा मृत्यू ;15 प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

भरधाव ट्रॅव्हल बस व कंटनेरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत.

पांगरी : अति वेगात आलेल्या ट्रॅव्हल बस व कंटनेरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास बार्शी-लातूर रस्त्यावर कुसळंब (ता. बार्शी) जवळील एलपीजी गॅस पंपासमोर घडली.

रमेश सुदाम गंभिरे (रा. वागदरी, ता. रेणापूर) व शिवमूर्ती बिभीषण कांबळे (रा. गुजरागा, ता. निलंगा) अशी मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. जखमींना बार्शीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत कंटेनर चालक गफूर उमरसाब मासुदार (वय 50, रा. लातूर) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात म्हटले, गफूर उमरसाब मासुदार हे त्यांच्या ताब्यातील कंटेनरमध्ये (एमएच 12-एफसी 8022) कुरकुंभ एमआयडीसी येथून रिलायन्स कंपनीचे पार्ट घेऊन नागपूरला जात असताना बार्शी-लातूर रस्त्याने कुसळंबजवळ आलो असता समोरून अति वेगाने आलेल्या ट्रॅव्हलचा (एमएच 24-जे 9097) चालक किशोर अंगद शिंदे (खलग्री, ता. रेणापूर) याने ट्रॅव्हल प्रवासी बस चुकीच्या दिशेला येऊन कंटेनरला जोरदार धडक दिली.

यात रमेश गंभिरे व शिवमूर्ती कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अक्षता शिवानंद भालके (वय 22, रा. लातूर), योगिता बाबूराव जाधव (वय 27), आदित्य राम पांचाळ, श्‍याम मुरली पांचाळ (वय 40), योगिता श्‍याम पांचाळ (रा. सर्व हासेगाव, ता. औसा), अंकुश विजय उंबरे (वय 36), नागनाथ गोरोबा सुरवसे (वय 32), लक्ष्मण बाळासाहेब करपे (वय 62), गफूर उमरसाब मासुदार (वय 50), किशोर अंगद शिंदे, विठ्ठल नारायण सोळंकी (वय 75), नीलकंठ विठ्ठल राचुटे (वय 35), योगेश राजेंद्र सराफ (वय 26), शालिनी तानाजी सूर्यवंशी (वय 21), पार्वती महादेव बैलारे(वय 42) अशा जखमींना 108 च्या दोन रुग्णवाहिकेने बार्शीच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. यात दोन्ही वाहनांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Two passengers died in a bus accident15 passengers injured