दोन धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या दोघांना कोर्टाचा दणका

सुदर्शन हांडे
गुरुवार, 24 मे 2018

बार्शी - वैयक्तिक भांडणातून दोन धर्मात वाद निर्माण करणाऱ्या बार्शीतील दोघांना अदखलपात्र गुन्ह्यात पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देत दोघांना न्यायालयाने दणका दिला आहे. अजय गोपी चव्हाण (वय २३) व रज्जाक अहमद शेख (वय २८) दोघे रा.४२२ गाडेगाव रोड बार्शी अशी आरोपींची नावे आहेत. 

बार्शी - वैयक्तिक भांडणातून दोन धर्मात वाद निर्माण करणाऱ्या बार्शीतील दोघांना अदखलपात्र गुन्ह्यात पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देत दोघांना न्यायालयाने दणका दिला आहे. अजय गोपी चव्हाण (वय २३) व रज्जाक अहमद शेख (वय २८) दोघे रा.४२२ गाडेगाव रोड बार्शी अशी आरोपींची नावे आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी, १२ मे रोजी बार्शी येथील गाडेगाव रोड येथे अजय चव्हाण व रज्जाक शेख यांच्यात व त्यांच्या साथीदारात वैयक्तिक कारणावरून लाकडी बॅट व लाथा बुक्क्यांनी मारामारी झाली. यावेळी परस्पर विरोधात बार्शी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर त्या परिसरात दोन धर्म बांधवात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या नंतर पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे, पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांनी शांतता कमिटीची मिटिंग घेऊन दोन्ही समाजातील लोकांना शांतता राखण्याच्या सूचना केल्या होत्या. 

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन दोन्ही गटातील आरोपी हे वेगवेगळ्या धर्मातील असून, दोन्ही गट वैयक्तिक भांडणाचा राग मनात धरून एखादा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याची शक्यता असल्याने त्यातून जातीय तेढ निर्माण होऊ शकते. यामुळे दोघांना न्यायालयासमोर उभे करुन सर्व गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. यासाठी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. या प्रकरणी प्रथमवर्ग न्याय दांडाधिकारी जयश्री राऊत यांनी दोन्ही आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अदखलपात्र घटनेत पोलिस प्रशासनाने प्रथमच भविष्यात कोणता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेतली. तर न्यायालयानेही तब्बल पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देऊन समाजात अशांतता पसरावणाऱ्या समाजकंटाकाची गय केली जाणार नाही असाच संदेश दिला आहे. 

Web Title: two people got punishment from court for making two religion fight