एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या दोघांचा भीमा नदीच्या पुरात बुडून मृत्यू

सूर्यकांत बनकर
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

सांगवी (ता. पंढरपूर) येथील हनुमंत गलांडे (वय 50) व धुळा गलांडे (वय 55) ह्या दोघांचा भीमा नदीच्या पुरात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. 11) रोजी घडली. आज तिसऱ्या दिवशी दोघांचेही मृतदेह बाहेर काढून करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत करकंब पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

करकंब - सांगवी (ता. पंढरपूर) येथील हनुमंत गलांडे (वय 50) व धुळा गलांडे (वय 55) ह्या दोघांचा भीमा नदीच्या पुरात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. 11) रोजी घडली. आज तिसऱ्या दिवशी दोघांचेही मृतदेह बाहेर काढून करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत करकंब पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

भीमा नदीच्या पुराचे पाणी सांगवी येथील ओढ्यात मागे सरले होते. रविवारी (ता.11) रोजी धुळा गलांडे व हनुमंत गलांडे हे एकादशीसाठी पंढरपूरला निघाले होते. दोघांनीही अंगातील कपडे काढुन डोक्याला बांधून ओढा पार करण्याचा प्रयत्न केला. पण सदर ओढ्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. हे दोघेही प्रत्येक एकादशीस पंढरपूरला जात असत. रविवारीही नदीला पूर आलेला असताना वारी चूकू नये म्हणून दोघेही पंढरपूरला निघाले होते पण त्याआधीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. 

सदर घटनेची नोंद करकंब पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरक्षक प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादासाहेब सुळ व संतोष पाटेकर करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Persons death due to drowning Bhima river