कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी दोन विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पंढरपूरसाठी निजामाबाद ते पंढरपूर नियमीत रेल्वे धावते. ती गत  महिन्यापासून नांदेड ते पंढरपूर, अशी सोडण्यात येऊ लागली. तरीही प्रत्येक पंधरवडा एकादशीला या गाडीत पाय ठेवायलाही जागा नसते. म्हणून कार्तिकी एकादशीला जाणा-या भाविकांचा लोंढा पाहता दोन गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.

परभणी : पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीनिमित्त आगामी आठवड्यात दोन विशेष गाड्या नांदेड विभागातून सोडण्यात येणार आहेत. प्रामुख्याने आदिलाबाद ते पंढरपूर आणि पूर्णा ते पंढरपूर, या गाड्या असून आगामी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. 

पंढरपूरसाठी निजामाबाद ते पंढरपूर नियमीत रेल्वे धावते. ती गत  महिन्यापासून नांदेड ते पंढरपूर, अशी सोडण्यात येऊ लागली. तरीही प्रत्येक पंधरवडा एकादशीला या गाडीत पाय ठेवायलाही जागा नसते. म्हणून कार्तिकी एकादशीला जाणा-या भाविकांचा लोंढा पाहता दोन गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्यान आदिलाबाद येथून ७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता वाजता आदिलाबाद-पंढरपूर (गाडी संख्या ०७५०१) पॅसेंजर सुटेल. ती नांदेड, परभणी, परळीमार्गे पंढरपूरला दुस-या दिवशी दिवशी सकाळी साडेसात वाजता पोहोचेल. 

परतीला ही रेल्वे (गाडी संख्या ०७५२७) पंढरपूर येथून ८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता सोडण्यात येणार असून ती पूर्णा स्थानकावर रात्री सव्वा नऊ वाजता वाजता पोहोचेल. दुसरीकडे पुर्णा ते पंढरपूर गाडी (गाडी संख्या ०७५२८) ११ नोव्हेंबर रोजी रात्री 
८.१० वाजता पुर्णा सोडण्यात येणार आहे. ती देखील परभणी, परळीमार्गे पंढरपूरला दुस-या दिवशी सकाळी साडेसात वाजता पोहोचेल. परतीला येताना १२ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता पंढरपूरातून ही गाडी निघणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two special trains for Pandharpur