पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बेळगावचे दोन विद्यार्थी साधणार संवाद

चाय पे चर्चा कार्यक्रमासाठी निवड
 Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi saskal

बेळगाव : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमा अंतर्गत बेळगाव येथील दोन विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता.1) रोजी होणाऱ्या परीक्षा पे चर्चा या विषयावरील पाचव्या सत्रातील परस्पर संवाद कार्यक्रमावेळी शिक्षक व विद्यार्थी यांच्याशी संवाद साधणार आहेत. यासाठी बेळगावच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून कार्यक्रमावेळी मच्छे येथील केंद्रीय विद्यालय क्र. 3 या शाळेचा विद्यार्थी श्रेयश मरगणकोप्प आणि सांबरा येथील केंद्रीय विद्यालय क्र. 1 या शाळेची विद्यार्थिनी जानव्ही डिबेल पंतप्रधानांशी संवाद साधतील.

गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चाय पे चर्चा या कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात. त्याचप्रमाणे परीक्षा लिहिताना तणावमुक्त कसे रहावे, याबाबतही मार्गदर्शन करीत असतात. त्यामुळे विद्यार्थी या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद देत असून सदर परस्पर संवादाचा कार्यक्रम आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने होणार आहे.

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. 'परीक्षा पे चर्चा' हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम असल्यामुळे सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचे आपापल्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये थेट प्रसारण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आली आहे. जेणेकरून सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना या कार्यक्रमाचा लाभ घेता येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मिलिंद देसाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com