नगर : तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

पाथर्डी (नगर) ः शेकटे येथे ऊसतोडणी मजुरांच्या परमेश्वर जगन्नाथ घुले (वय 16) व विष्णू राजेंद्र घुले (वय 15) या मुलांचा आज दुपारी अमनदरा तलावात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, दोघांच्या आई-वडिलांच्या आग्रहामुळे शवविच्छेदनाशिवाय दोघांवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत माहिती अशी ः परमेश्‍वर व विष्णू गावातील आश्रमशाळेचे अनुक्रमे दहावी आणि नववीचे विद्यार्थी होते. दोघेही आज शाळेत न जाता जनावरे चारण्यासाठी डोंगराकडे गेले होते. तेथे अमनदरा तलावात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने दोघेही बुडाले. त्यानंतर अशोक घुले तेथे शेळ्या चारण्यासाठी गेले असता, त्यांना मुलांचे कपडे तलावाच्या भिंतीवर दिसले. त्यांनी आरडाओरडा केला; ग्रामस्थांनी धाव घेऊन दोघांना पाण्यातून बाहेर काढले.

मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दोघेही आई-वडिलांना एकुलते होते. मुलांच्या मृतदेहांची चिरफाड होऊ नये, अशी भावना त्यांच्या आई-वडिलांनी व्यक्त केल्याने दोघांवर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेकटे येथील घटनेची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ घटनास्थळी गेलो होतो. मृत मुलांच्या नातेवाइकांना उत्तरीय तपासणीबाबत सांगितले. मात्र, त्यास त्यांनी नकार दिला. आमची कोणतीही तक्रार नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांचे व्हिडिओ शूटिंग करून तशी कायदेशीर नोंद घेतली आहे.
- रमेश रत्नपारखी, पोलिस निरीक्षक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two students drowned in a lake