उजनी पाणीपातळीत दोन टीएमसीने वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

सोलापूर - पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये असाच पाऊस सुरू राहावा अशीच अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.

सोलापूर - पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन टीएमसीने वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यात व उजनी धरण क्षेत्रामध्ये असाच पाऊस सुरू राहावा अशीच अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.

जिल्ह्याची वरदायिनी म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. मागील वर्षी धरण 100 टक्‍यांहून अधिक भरले होते. मात्र, उन्हाळी हंगामासाठी धरणातून पाणी सोडल्यामुळे धरणाची पाणीपातळी वजामध्ये गेली आहे. वजा 19 च्या पुढे धरणाची टक्केवारी गेली होती. मात्र, मागील एक-दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यात व धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे. रविवारी सकाळी सहा वाजता धरणात दौंड येथून एक हजार 482 क्‍युसेकचा विसर्ग मिसळत होता. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. मागील वर्षी धरणामध्ये जेवढे पाणी होते, तेवढेच पाणी यंदाच्या वर्षीही धरणात झाले आहे. टक्केवारीचा विचार केला तर मागील काही दिवसात धरणात पावणेचार टक्के पाणीसाठा वाढला आहे. तो टीएमसीमध्ये मोजला तर 1.85 टीएमसी इतक्‍या पाण्याची वाढ धरणामध्ये झाल्याचे दिसून येते.

धरणाची आजची सकाळी सहाची स्थिती कंसात मागील वर्षीची स्थिती धरणातील उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी - वजा 16.37 टक्के (वजा 16.83 टक्के) धरणातील उपयुक्त पाणीसाठा - वजा 8.77 टीएमसी (वजा 9.02 टीएमसी)

Web Title: Two TMCs grew on the Uijhi water level