दोन टन निर्माल्याचे झाले संकलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

सातारा - "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातर्फे अनंत चतुर्दशीला येथील संगम माहुली (ता. सातारा) येथे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. गणेशमूर्ती विसर्जन करणाऱ्या नागरिकांकडून निर्माल्य जमा करून ते खतनिर्मितीसाठी देण्यात आले. 

यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे गेली पाच वर्षे, तर धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयामार्फत गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सवात निर्माल्य संकल्पनाचा उपक्रम संगम माहुली येथे राबविला जात आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. टी. चवरे, "यिन' समन्वयक अभिजित बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून निर्माल्य संकलनाला सुरवात केली. गणेशमूर्ती विसर्जन करण्यास येणाऱ्या नागरिकांना निर्माल्य संकलनाबाबत जनजागृती करून त्यांच्याकडून ते संकलन करण्यात आले. दिवसभरात सुमारे टनभर निर्माल्याचे संकलन "यिन' सदस्य व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केले. 

Web Title: two tone Nirmalya Collection in satara