नगर - श्रीगोंद्यात कुकडी वितरिकेत दोन अनोळखी मृतदेह 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

श्रीगोंदे (नगर) : कुकडी कालव्यातून आज सकाळी अनोळखी दोन पुरुषांचे मृतदेह पोलिसांनी पाण्याबाहेर काढले. यातील एकाचा मृत्यू रात्री, तर दुसऱ्याचा काही दिवसांपूर्वी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

तालुक्‍यातील घोडेगाव शिवारातील तेरा क्रमांकाच्या वितरिकेच्या पाण्यात हे मृतदेह मिळाले. या दोघांचा काहीही संबंध नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. घोडेगाव येथील चाव्हर वस्तीजवळ एका झुडपात अडकलेला एक मृतदेह आढळला, तर दुसरा पाण्यात वाहत होता. 

एकाचे वय अंदाजे 22, तर दुसऱ्याचे 30 आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे पंचनामे केल्यानंतर उत्तरीय तपासणी करण्यात आली. मृतदेहांची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिस करीत असून, दोन्ही व्यक्तींच्या अंगावर कुठल्याही गंभीर जखमा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: Two unidentified bodies in Kukadi distillery in Shrigonda