दुचाकीचोरांची टोळी गजाआड, वाहनेही केली हस्तगत 

crime story
crime story

नगर ः शहरातील जुन्या बाजारातील सराफ रूपेश शिवनारायण वर्मा यांनी काल (मंगळवारी) दुचाकीचोरीची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तातडीने पावले उचलत, अवघ्या 24 तासांत वर्मा यांची दुचाकी चोरणारी टोळी गजाआड केली. या कारवाईत तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. 

वर्मा यांच्या दुचाकीचोरीच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांनी लगेच शोधमोहीम सुरू केली. या गुन्ह्यातील आरोपी बनावट कागदपत्रे तयार करून वाहनांची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अक्षय विठ्ठल जंगम (वय 20, रा. भोसले आखाडा) याला पकडले. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त केली. चौकशीत त्याने समीर खोजा शेख (रा. झारेकर गल्ली, नगर) व गोरख भारत सुरवाडे (वय 21, रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता, नगर) यांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. 


ही वाहने विक्रीसाठी केडगाव येथील आकाश अरुण दळवी याने मदत केल्याचे सांगितले. पोलिसांनी अक्षय जंगम, समीर शेख व गोरख सुरवाडे यांना अटक केली असून, त्यांच्याकडील चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com