भोरस येथील अपघातात दोन तरुणांचा मृत्यु

दीपक कच्छवा
गुरुवार, 22 मार्च 2018

चाळीसगाव-धुळे महामार्गावर झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यु झाला.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - चाळीसगाव-धुळे महामार्गावर ओमनीची व दुचाकी धडक झाल्याने घटना नुकतीच घडली. भोरस (ता. चाळीसगाव) येथील एकजण जागीच ठार होता. त्यातील दुसऱ्या तरुणाचा देखील आज धुळे येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 
 
चाळीसगाव-धुळे महामार्गावर सत्यम जिंनीगजवळ दि. 19 रोजी रात्री दहाच्या सुमारास चाळीसगावकडून धुळ्याकडे जाणारी ओमनी क्रमांक MH.18 D 219 ची दुचाकी क्रमांक MH.19.AA 6331 ला धडक दिली. दुचाकीवर असलेल्या राजेंद्र अर्जुन मोरे (वय 24) हा जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असलेला छोटु जगताप (वय 24) या तरुणावर धुळे येथे रूग्णालयात उपचार सुरू असतांना त्याचा देखील आज मृत्यु झाला. या घटनेने भोरस गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Two young boys were killed in an accident in Bhoras