पंढरपूरजवळ अपघातात वाखरी येथील दोन जण ठार

अभय जोशी
गुरुवार, 10 मे 2018

पंढरपूर: टेंभुर्णी-पंढरपूर रस्त्यावर अकोले (बुद्रुक) गावाजवळ मोटारीने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकल वरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (गुरुवार) दुपारी बाराच्या सुमारास घडला. अपघातात मयत झालेले दोन्ही तरुण वाखरी (ता. पंढरपूर) येथील आहेत.

या अपघाताची समजलेली माहिती अशी की, वाखरी येथील सागर शरद माने (वय 24) आणि सुहास दादासाहेब शिंदे (वय 24) हे मोटारसायकल वरुन टेंभुर्णी कडून पंढरपूर कडे येत होते. अकोले (बु.) गावाजवळ समोरुन आलेल्या मोटारीने मोटारसायकलला जोराने धडक दिल्याने मोटारसायकल वरील दोघेजण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. अपघातात मयत झालेल्या दोघांचे मृतदेह टेंभुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले आहेत. दरम्यान, या अपघाताचे वृत्त वाखरी येथे समजताच गावावर शोककळा पसरली.

Web Title: Two youth killed in an accident near Pandharpur