त्यागराज पेंढारकर यांचे निधन

त्यागराज पेंढारकर यांचे निधन

कोल्हापूर - ‘दो आँखे बारह हाथ’, ‘श्री ४२०’, ‘नवरंग’ आदी गाजलेल्या चित्रपटांतील प्रत्येक प्रसंग दृश्‍य स्वरूपात रसिकांच्या काळजावर कोरणारे छायालेखक त्यागराज पेंढारकर (वय ९३) यांचे आज निधन झाले. येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. 

गेल्या काही दिवसांपासून त्यागराज पेंढारकर यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या रुक्‍मिणीनगर येथील निवासस्थानात पार्थिवदर्शन झाल्यानंतर सायंकाळी उशिरा पंचगंगा घाटावर अंत्यसंस्कार झाले. 

त्यांनी टिपलेली चित्रपटांतील दृश्‍ये रसिकांच्या मनःपटलावर दीर्घकाळ राहिली. जादुई नजरेचा प्रतिभासंपन्न छायालेखक व हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीचा चालता-बोलता इतिहास, संवेदनशील छायालेखनातील गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना चित्रपंढरीतून व्यक्त झाली. ज्येष्ठ अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचे पुत्र असलेले त्यागराज पेंढारकर यांनी सहा दशके हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी आदी भाषांतील चित्रपटांसाठी छायालेखन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com