कामटेंची कार्यशैली सर्वांना अनुकरणीय - उदयनराजे

कामटेंची कार्यशैली सर्वांना अनुकरणीय - उदयनराजे

सातारा - ज्या स्पिरिटने अशोक कामटे वागले, त्या स्पिरिटने देशातील सर्व एसपी, डीआयजींनी वागले पाहिजे. त्यांच्या कार्यशैलीचे अनुकरण केले पाहिजे. माणूस असावा तर असा. आज ते आपल्यात असते तर महाराष्ट्र पोलिस अधिकाऱ्यांत ते टॉपला असते; पण त्यांनी कधी टॉपचा विचार केला नाही, अशा शब्दात काहीसे भावनिक होत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी हुतात्मा कामठे यांना आदरांजली वाहिली.

सातारा नगरपालिकेच्या वतीने २६/११ च्या पार्श्‍वभूमीवर सदरबझारमधील हुतात्मा अशोक कामटे उद्यानातील त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. या वेळी खासदार उदयनराजे यांनी हुतात्मा कामटे यांना आदरांजली वाहिली. या वेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी डी. एन. वैद्य, नगराध्यक्षा माधवी कदम, नगरसेविका रजनी जेधे, निशांत पाटील, वैभव पोतदार, मनीष चव्हाण, राजू जेधे, शशांक ढेकणे, आदी उपस्थित होते.

उदयनराजे म्हणाले, ‘‘अशोक कामटे हे माझे जवळचे मित्र होते. त्यांची पत्नी विनिता ही माझी क्‍लासमेट. त्यांचे अनेक किस्से सांगता सांगता, बघता बघता माझे मित्र गेले.  एवढेच सांगायचे आहे, ज्या स्पिरिटने अशोक वागला, त्या स्पिरिटने महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एसपी, डीआयजींनी वागावे. त्यांचे अनुकरणही केले पाहिजे. माणूस असावा तर असा. आज ते हयात असते तर ते महाराष्ट्रात सगळ्यात टॉपला असते; पण त्यांनी कधी टॉपचा विचार केला नाही. यालाच माणूसकी म्हणतात आणि त्यालाच अशोक कामटे म्हणतात.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com